बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे? की फक्त डोक्यावर पडल्यासारखं फेसबुक लाईव्ह करणार??”

मुंबई |   मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्य सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? की फक्त डोक्यावर पडल्यासारखं गोड गोड बोलून फेसबुक लाईव्ह करणार आहात, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

लॉकडाऊन उठवण्यासंबंधीचा प्रॉपर प्लॅन राज्य सरकारकडे आहे का? असा सवाल करत ब्रिटनने जसा लॉकडाऊन शिथील करण्यासंबंधीचा आराखडा जाहीर केला आहे तसा आराखडा महाराष्ट्र शासनाने जनतेसमोर मांडावा, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

लॉकडाऊन उठवताना विशिष्ट तारखेला तुम्ही कुठली दुकाने सुरू करणार आहात. मग पंधरा दिवसांनी, एक महिन्यांनी, दीड महिन्यांनी परिस्थितीत कशी सुधारणा होऊ शकते, मग त्यावर शासना विचार करून कोणते निर्णय घेऊ शकते, याचा आराखडा देखील राज्य शासनाने जाहीर करणं गरजेचं असल्याचं मत देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने तसंच केंद्र सरकारने लवकरात लवकर लॉकडाऊन शिथीलतेचा आराखडा जाहीर करावा. फक्त फेसबुक लाईव्ह करून गोड गोड गप्पा मारून काहीही सध्या होणार नाही किंवा त्यातून काहीही निष्पण्ण होणार नाही, असंही देशपांडे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

महत्वाच्या बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More