“वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास”, संदीप देशपांडेंनी डिवचलं
ठाणे | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राज्यात मोठी राजकीय जुगलबंदी रंगली आहे. शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेला संपलेला पक्ष असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
आम्हाला संपलेला पक्ष म्हणत आहेत त्यांनी स्वत: अगोदर आपल्या पक्षाचं बघावं, असं देशपांडे म्हणाले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा खोटा डाव आखत शिवसेनेनं राजकारण केलं आहे. वसंत दादा पाटील ते आता शरद पवार यांच्यापर्यंत शिवसेनेचा प्रवास आहे, अशी टीका देशपांडे म्हणाले आहेत.
वसंत सेना ते पवार सेना प्रवास करणाऱ्यांनी आमच्या पक्षाला शिकवू नये, असा सल्ला देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मनसे नेते मोठ्या प्रमाणात शिवसेनेवर टीका करताना पहायला मिळत आहेत. देशपांडेंच्या टीकेनंतर शिवसेनेकडून उत्तर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाण्यात मनसेनं मोठ्या सभेचं आयोजन करत महापालिका निवडणुकीत ताकत लावण्याचा निर्धार केला आहे. परिणामी महाविकास आघाडी आणि मनसेतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”
रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…
“संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव टाकून…”; प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
Comments are closed.