औरंगाबाद महाराष्ट्र

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

औरंगाबाद | मंत्रिमंडळाने औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी राजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे.

जोपर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही, तोपर्यंत ती औरंगाबादचं नामांतर करू शकणार नाही, असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.

सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही. औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागेल आणि काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. आता राज्य सरकारने विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र विमानतळाचं नाव कसलं बदलता आधी शहराचं नाव बदलून दाखवा, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकाधिक तापत चालला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असं थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या