“….नाहीतर रस्त्यावर पवार, पवार असं ओरडत फिरायची पाळी येईल”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयोगावर आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत सतत शिंदे सरकारवर (Shinde Goverment) देखील निशाणा साधत आहेत. अशात राऊत यांचा हा संताप पाहून मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राऊत यांना पत्रातून डिवचलं आहे.

हे येडxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे, असा टोला देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे.

आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी, असं राऊत म्हणालेत.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या. मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, अशी खोचक टीका संदीप देशपांडेंनी केलीये.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, असं संदीप देशपांडेंनी पत्रात म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-