मुंबई | औरंगाबादच्या नामांतरावरून चाललेल्या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसेनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे.
आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणं जमत नाही, अशी टीकाही देशपांडेंनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान, 26 जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केलं जाणार असल्याचा इशाराही देशपाडेंनी दिला आहे. भाजपसुद्धा नामांतर करण्याची मागणी करत आहे त्यात मनसेनेही ही मागणी केल्याने शिवसेना कोडींत पडणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशारा
रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये
“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”
लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!