बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

मुंबई | राज्याच मान्सूल लवकर दाखल झाला आहे. पहिल्याच पावसाच्या दणक्यात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली  मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील 20 पेक्षा जास्त  मॅनहोल्स उघडे असल्याचं मनसेने समोर आणल आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असूनही ही अवस्था इथे आहे तर मुंबई शहराचं काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यासोबतच किशोरी पेडणेकरांवरही टीका केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर फक्त दावा करतात मात्र किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत ते त्यांनी तपासावं. आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढतात त्यांनी जास्त शहाणपणा शिकवू नये, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या अडचणीमुळे आता भाजपनेही शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, ‘हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

गप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर राखीने केला भर पावसात डान्स, व्हिडीओ व्हायरल

शेवटी आईच हो ती! सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More