Top News महाराष्ट्र मुंबई

कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?- संदीप देशपांडे

मुंबई | कालपासून देशातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र सामनामध्ये लसीकरणाच्या बातमीला दिलेल्या शीर्षकावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.

लसकर-ए-कोरोनाचा, असं शीर्षक सामनामध्ये लसीकरणाच्या बातमीला देण्यात आलं आहे. यावर कोरोनाच्या लसीची तुलना लष्कर-ए-तोयबा बरोबर कशी केली जाऊ शकते, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे. यासंदर्भात देशपांडेंनी ट्विट केलं आहे. सामनातील लसीकरणाच्या बातमीचा फोटो देशपांडेंनी शेअर केला आहे.

दरम्यान, कोरोनाला हरवायचं या निर्धारानं उतरलेल्या कोरोना योद्ध्यांना लस आल्यामुळं सुरक्षा कवच मिळालं असून आता आरपारची लढाई सुरु झाल्याचंही सामनाच्या बातमी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

शार्दुल आणि वाशिंग्टनने केली कांगारूंची बोलती बंद! सुंदरने केला 110 वर्षानंतर ‘सुंदर’ विक्

‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा”

“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या