मुंबई | मनसे संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असं शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर मनसे नेते आक्रमक झाले असून त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि अनेक वर्षे तिथं स्मारक न करणं याला टाईमपास म्हणतात, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात देशपांडेंनी ट्विट केलं आहे.
औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली याला म्हणतात टाइमपास!, मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते याला म्हणतात टाईमपास, असंही कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
“औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…
याला म्हणतात, टाइमपास!@AUThackeray— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) February 4, 2021
“मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ” असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाइमपास! @AUThackeray
— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) February 4, 2021
थोडक्यात बातम्या-
“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”
महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?
“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”
तात्या विंचूला जिवंत करणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड
“70 दिवसांपासून मुग गिळून गप्प बसलेले आता तोंडं उघडायला लागलेत”