बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला. आता याच बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शेअर केला आहे.

दोन्ही नेत्यांचा एकाच व्यासपीठावरील फोटो शेअर करत मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांचा दौरा रद्द होण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप केला आहे.

तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे, असं संदीप देशपांडेंनी ट्विट करत म्हटलंय.

दरम्यान, रविवारी पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी हा दौरा रद्द करण्यामागील कारणांवरही भाष्य केलं. माझा अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला. परंतु राज यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं टाळलं होतं. आता या फोटोवरून मनसेने थेट पवारांवर आरोप केलाय.

थोडक्यात बातम्या- 

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले

‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका

‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More