बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे करत होते”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेकडून (MNS) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा खोचक सवाल मुख्यमंत्री ठाकरेंनी उपस्थित केला होता. या टीकेवरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाली आहे म्हणून ते असले प्रश्न विचारत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राज्यभर दौरे करत होते. शिवसेना वाढवण्याचं काम करत होते, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी विनंती केली म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केले हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.  तर उद्धव ठाकरे नवपुरोगामी झाले असल्याचंही संदीप देशपांडे म्हणाले आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंच्या सभेआधी अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई पोलिसांचा राणा दांपत्याबद्दल धक्कादायक दावा, ‘ही’ माहिती समोर

नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर राखी सावंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…’हे’ षडयंत्र भाजपवरच उलटणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More