बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला पाहून फार वेदना होतात”

मुंबई | राज्यात सध्या शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात संघर्ष सुुरु होता, तो संपतो ना संपतो तेच मनसेनं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे, यामध्ये आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडल्याचं पाहून वेदना होतात, असं लिहिलं आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरात चालत असलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रातून एक बाण चुकून तत्कालीन महापौर निवासस्थानात जाऊन पडला, यामध्ये कुणालाही इजा झाली नाही, मात्र त्यानंतर हे प्रशिक्षण केंद्रच बंद करण्याचा फतवा आपण काढलात. शिवसेनेचं काय दुर्भाग्य किंवा विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर निवडून येता त्या चिन्हामागचा विचारच आपल्याला संपवावा वाटतोय?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी पत्रातून केला आहे.

धनुर्विद्या करणारे खेळाडू आज निराशेत आहेत, त्यांना सरावासाठी जागा नाही. आपण आमदार आणि सभागृहनेत्यांना आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आर्चरी क्लबने स्थानिक आमदार, नगरसेविका व सभागृहनेत्या तसेच महापालिकेशी पत्रव्यवहार केला पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. ज्या धनुर्विद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखांचं ऐकलं जात नसेल तर शिवसेनेला आपलं पक्ष चिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आहे का? का बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतील बाणच मारण्यात पटाईत आहे? असा सवाल खेळाडूंच्या मनात आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, अशी अवस्था असेल तर ऑलिम्पिंगमध्ये भारताला पारितोषिकं कशी मिळणार? जे खेळाडूंचं प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करतायेत त्यांना ऑलिम्पिंगमधील खेळाडूंना ‘वर तोंड’ करून शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे? ज्या प्रमाणे कॉमनवेल्थमध्ये काँग्रेसने भ्रष्ट्राचार केला होता, कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेनेही हाच तर कॉमन मिनिमन प्रोग्राम तर आखला नाही ना? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना आणि धनुर्विद्याप्रेमींना पडला आहे. प्रशिक्षण चालवणाऱ्या संस्थेनं अनेक पदकं मिळवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे. या संस्थेसाठी नाही पण आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा धनुर्विद्येसाठी तरी आपण आर्चरी क्लबच्या सरावासाठी जागा मिळवून द्यावी, नाहीतर आपल्या पक्षाचे चिन्ह विसर्जीत करुन जमीन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू ‘घड्याळ’ तरी करावे, असंही या पत्रात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, सपना चौधरीनंतर ‘या’ डान्सरची वाढतेय क्रेझ!

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More