बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये”

नागपूर | नागपूरमध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यामधील वाद टोकाला गेला आहे. व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचा आरोप करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला. तसेच महापौरांवर दुटप्पीपणाचा आरोप केला. यानंतर आता नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत जोशी यांनी मुढेंवर निशाणा साधला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचा फोन उचलत नाही. महापौरांच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. मुंढे नगरसेवकांना भेटत नाहीत. चार चार महिने नगरसेवकांच्या फाईल दडवून ठेवतात. महापौरांचा अपमान करतात, असंही संदीप जोशी यांनी म्हटलंय.

सभागृहात प्रश्न विचारणे हा सदस्यांचा अधिकार आहे. महासभेत माझी भूमिका कायद्यानुसार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्यान होणाऱ्या महासभेत यावं, अशी हात जोडून विनंती करतो, असंही महापौर संदीप जोशी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, या अभिनेत्रीचा दावा

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार

कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा-कॉलेज उघडू नका, कपील पाटलांचं मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र

कृषी मंत्र्यांचं स्टिंग ऑपरेशन, कामचुकार अधिकाऱ्यावर केली कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More