बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षाने तुम्हाला काय कमी केलं होतं???….; पुतण्याचा काकाला सवाल

मुंबई |  पक्षाने तुम्हाला काय कमी केले होते. खरंतर ज्या दिव्यांची चर्चा आहे ते चटके कुणी दिले हे सगळ्यांनाच माहिती आहे. आण्णांनी आत्मचिंतन करावं, असं जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदिप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर संदिप क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्यांच्या निर्णयाने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आमच्यात विचारांचा जो काही वाद होता तो मान्य आहे. त्यांच्यामुळेच माझी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गेली, असा आरोपही त्यांनी क्षीरसागरांवर केला.

मला शेवटपर्यंत वाटत होतं की आण्णा पवार साहेबांशी चर्चा करतील. खरं तर कुणी कुणाला धोका दिला हे पाहणे गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-फक्त प्रकाश आंबेडकरांचा पराभव होऊ द्या; भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी

-…म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; अजित पवारांनी सांगितलं कारण

-निकालाच्या एक दिवस आधी अमित शहांनी विरोधकांना विचारले हे 6 प्रश्न!

-उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारने लिहिली फेसबुक पोस्ट

-वैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More