Uddhav Thackeray Shivsena | नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात महाविकास आघाडीचा राज्यात दारुण पराभव झालाय. महायुतीने बहुमत प्राप्त करत सत्ता देखील स्थापन केली आहे. मविआला तिन्ही पक्ष मिळून 50 जागा देखील मिळवता आल्या नाहीत. विधानसभेतील पराभवानंतर मविआने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (Uddhav Thackeray Shivsena)
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तर बैठकांचे सत्र देखील सुरू केले आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी यामध्ये पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते खासदार संजय राऊत यांच्या बंधूंनी घेतलेली भूमिका चर्चेत आली आहे.
संदीप राऊत यांच्या पोस्टने खळबळ
खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊतांनी पक्षाला धक्का दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचं दिसून येतंय.
संदीप राऊत हे कार्यकर्त्यांमध्ये अप्पा राऊत म्हणून ओळखले जातात. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संदीप राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. नेत्यांच्या पुढं पुढं करणा-यांनाच पक्षात पद मिळत असल्याचं देखील त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. (Uddhav Thackeray Shivsena)
संदीप राऊत यांची पोस्ट नेमकी काय?
“अलिकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपारिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातंय,” असं या पोस्टमध्ये संदीप राऊत यांनी म्हटलं आहे.. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी असून त्यांच्या या पोस्टचा रोख कुणाकडे आहे, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर एक बैठक घेतली होती. याच बैठकीच्या दिवशी संदीप राऊत यांनी ही पोस्ट केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये ‘मिशन मुंबई’अंतर्गत काही सूचना नेत्यांना केल्या. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा अपप्रचार विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आला.त्यामुळे अपयश मिळाल्याचं नेत्यांनी बैठकीत सांगितल्याचं कळतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला आहे. तशा सूचना देखील त्यांनी केल्या असल्याची माहिती आहे. (Uddhav Thackeray Shivsena)
News Title – Sandeep Raut post on Uddhav Thackeray Shivsena Group
महत्वाच्या बातम्या-
‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला मिळालं इतक्या कोटींचं मानधन!
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी, शाळांच्या वेळात मोठा बदल
मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण
“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?
मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!