संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अखेर जामीन

मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ते अटकेत होते.

संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठही कार्यकर्त्यांची 15 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली. सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. 

आरोपपत्र दाखल करण्यात येईपर्यंत प्रत्येक आठवड्याला त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

दरम्यान, कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून जेलमध्ये असलेले हे सर्वजण बाहेर येतील.