मुंबई | 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघत आहे. पाकिस्ताना आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर हाकलावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर टीका केली होती. यावर मनसे नेते संदीप देशपाडे यांनी पलटवार केला आहे.
ज्यांची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये, असं म्हणत देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेतृत्वाचा आम्ही मान राखतो, त्यांनीही आमचा मान राखावा, असंही मनसेकडून म्हणण्यात आलं आहे.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भगवे कपडे आणि भगवे टोपी घालून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी होत आहेत.
दरम्यान, मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. तसेच मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात आहे, असा आरोप शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
“शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झालीय”
ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही- संजय राऊत
मी नाराज नाही, पूर्णपणे पक्षासोबत आहे- तानाजी सावंत
तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या…
Comments are closed.