Top News

“तेव्हाचं स्वाभिमानी नेतृत्व आणि आत्ताचं लाचार… फरक लगेच जाणवतो”- मनसे

मुंबई |  ‘ठाकरे’ सिनेमा रिलीज झाला असला तरी त्यावरून सुरू असलेले वाद आणखी काही थांबताना दिसत नाहीयेत. सिनेमा पाहून आल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिलीय.

संदीप देशपांडे म्हणतात- कालचं ठाकरे चित्रपट पाहिला. तेव्हाचं स्वाभिमानी आणि आत्ताचं लाचार नेतृत्व फरक लगेच जाणवतो… अशी तिखट प्रतिक्रया देशपांडे यांनी आपल्या ट्वीटरवरून दिलीय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्दव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर आणि एकूणचं शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये तुलना करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना लाचार संबोधून देशपांडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल!

मुंबई बंद पाडणारा लढवय्या माणूस ‘जाॅर्ज फर्नांडीस’ काळाच्या पडद्याआड

-जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत, नाही तर त्यांच्याशिवाय- मुख्यमंत्री

-गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

-नितीन गडकरी यांनी ते वक्तव्य मोदींना उद्देशूनच केलं- काँग्रेस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या