बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

मुंबई | विरप्पनने जेवढं लुटलं नसेल त्यापेक्षा जास्त मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लुटलं आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे.

मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाण साधलाय. येणाऱ्या निवडणुकीत विरप्पनचा एन्काऊंटर करावाच लागेल, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, असं संदीप देशपांडे म्हणाले.

पालिकेतील सत्ताधारी हे त्यांच्याच लोकांना काम देत असून यात मोठी लूट आहे. या लूटीविरोधात मनसे आता सर्व पालिका निवडणुकीत जोमाने उतरणार आहे, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! गावाला येत नसल्याने पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या

…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?”

सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार

“राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना “

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More