मुंबई | पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनविरोधात मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं आहे. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. तसेच मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात आहे, असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला आहे. मात्र शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मनिषा कायंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना या देशातून चले जाव असा इशारा देणारा राज ठाकरेंचा मोर्चा आहे. या मोर्चात भाजप, राष्ट्रवादी, स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता सहभागी होईल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे आज जी राजकीय भूमिका मांडतील. ती मनसेची पुढची दिशा ठरवणारी असेल, असं मतही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच- भैयाजी जोशी
चित्रपट पाहताना लालकृष्ण अडवाणींना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या-
मनसेच्या मोर्चासाठी चक्क भाजप आमदाराच्या गाड्या
मनसेच्या मोर्चात भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही सहभागी होणार- संदीप देशपांडे
मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात; शिवसेनेचा आरोप
Comments are closed.