मुंबई | लोकसभा निवडणुकीत मतदारराजाने भाजपला निर्वावाद बहुमत दिले आणि विरोधकांचा सुफडासाफ केला. त्यानंतर विरोधक खडबडून जागे झाले आहेत. त्याची सुरूवात महाराष्ट्रापासून झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारणही तसेच आहे… गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी आणि त्यानंतर होणाऱ्या हालचाली….
महाराष्ट्राच्या त्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रयोगाची गरज आहे, असं ट्वीट मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे. या ट्वीटनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे निर्णायक भूमिका घेणार आणि नवीन प्रयोग चाचपडून पाहणार, असे स्पष्ट संकेत देशपांडेंनी दिले आहेत.
महाराष्ट्र्याच्या त्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रोयोगाची गरज आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 30, 2019
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी तर आज काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलीय. या सगळ्या होणाऱ्या भेटी आगामी महत्वाच्या समिकरणांची नांदी ठरतीये का? हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘या’ राज्यात काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी सोपवले पक्षाकडे राजीनामे
-मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
-मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासाठी ‘ही’ नावं चर्चेत!
-बरेलीचे खासदार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
-गळा कापल्यानंतर डोकं ठेचून महिला पोलीस उपनिरीक्षकाची हत्या
Comments are closed.