शिवज्योत घेऊन जाताना भीषण अपघात, 5 शिवप्रेमींचा मृत्यू

सांगली | शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या भीषण अपघातात 5 शिवप्रेमींचा मृत्यू झालाय. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आंबेडकर नगर परिसरात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 

या अपघतात 20 विद्यार्थी जखमी असल्याचं कळतंय. अपघातातील सर्व विद्यार्थी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातील आहेत.

शिवजयंतीनिमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन चालले होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये 30 विद्यार्थी होते. समोरुन आलेल्या बाईकला चुकवताना हा अपघात झाला. त्यामुळे ट्रक उलटून विद्यार्थी ट्रकखाली सापडले.