महाराष्ट्र सांगली

धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील तब्बल 63 कैद्यांना झालीय कोरोनाची लागण

सांगली | सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कारागृहातील तब्बल 63 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. या बाधीत कैद्यांतील एका रूग्ण नुकताच जामिनावर बाहेर पडलेल्या रूग्णाला शोधण्यासाठी आता प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा कारागृहात एकाच वेळी तब्बल 63 कैद्यांनी कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना बाधीत सर्व कैद्यांना जेलमध्येच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या कारागृहातील काही कैद्याचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्यानं त्यांची स्वतंत्र ठिकाणी विलगीकरणाची सोय केली आहे. कारागृहातील सर्व कैद्यांची रॅपिड टेस्ट केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

या बाधीत रूग्णांचा संपर्क इतर कैद्यांशी आल्यानं कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. काच वेळी तब्बल 63 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनाच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राम मंदिरावर ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गडकरींची पहिली प्रतिक्रिया

बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमीपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही, नाहीतर…- गिरीश महाजन

आयुष्यात पहिल्यांदा एवढं पाणी पाहतोय, मुंबईच्या पावसाने शरद पवार आश्चर्यचकित!

राज्यात एनडीआरफच्या 16 टीम तैनात; ‘या’ जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.