संभाजी भिडेंना पोलीस संरक्षण, सुरक्षेसाठी 5 पोलीस तैनात

सांगली | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ‘शिवप्रतिष्ठान’च्या संभाजी भिडे यांनाच पोलिसांनी संरक्षण दिलंय. 5 पोलीस 24 तास त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. 

मला संरक्षणाची गरज नाही. मला कुणाकडूनही धोका नाही, त्यामुळे हा बंदोबस्त मागे घ्या, अशी विनंती संभाजी भिडे यांनी पोलीस प्रमुखांना केलीय. मात्र तरीही त्यांच्यासोबतचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय. 

दरम्यान, बंदोबस्तातील पोलीस साध्या वेशात आहेत. रात्रीही त्यांच्या सांगलीतील खोलीबाहेर हे पोलीस पहारा देत असतात. सांगलीतील मोर्चावेळीही हे पोलीस त्यांच्यासोबत असतात.