संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगलीत भव्य मोर्चा

सांगली | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याविरोधात शिवप्रतिष्ठान संघटनेने सांगलीत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. 

भिडे गुरुजींवरील गुन्हे धादांत खोटे आहेत. ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आलं. 

भिडे गुरुजी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या मागे मोठं षडयंत्र आहे, याप्रकरणी भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.