बीड | सांगली कोल्हापूरात पुराने हाहाकार माजलाय. सरकार युद्धपातळीवर जोरदार प्रयत्न करत आहे. संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भाजपच्या केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या एका महिन्याचं आमदारकीचं वेतन पूरग्रस्तांचा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संगीता ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तश्या पद्धतीचं एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याबाबत त्यांनी सुचित केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यांच्या याच आवाहनाला राज्यातील विविध संस्थानी, व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी आणि राजकीय पक्षांनी प्रतिसाद दिला आहे. आमदार ठोंबरे आपला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.
दरम्यान, सांगली-कोल्हापूरातली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी 48 ते 72 तास लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या’ तिघांसाठी सदाभाऊ खोत देवासारखे धावून आले…!
-हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं काश्मीरवरून वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…
-अजून मी म्हातारा झालेलो नाही- शरद पवार
-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला
-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…
Comments are closed.