Top News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आज दुपारी 3.30 वाजता त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.

परखड मतांसाठी मा. गो. वैद्य ओळखले जात होते. ते तरूण भारताचे माजी मुख्य संपादक देखील होते. याशिवाय संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.

प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. प्रकृतीच्या कारणाने त्यांना स्पंदन रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

विविध उत्कृष्ट अग्रलेख तसंच विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्य यांचा पत्रकारिता तसंच समाजसेवेचे अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना हटवून ‘या” माजी खेळाडूची प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या