“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, मनोज जरांगे यांच्या ‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil Movie | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना भाजपने चांगलंच घेरलं होतं. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात थेट जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Movie) यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

विधानसभा अध्यक्षांनी याची घोषणा केली. यानंतर जरांगे यांनी आपले शब्द मागे घेतले. भाजपकडून या आंदोलनामागे तर थेट राष्ट्रवादीचा हाथ असल्याचा आरोप करण्यात आला. यातील सत्य लवकरच बाहेर पडणार, असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यापुर्वीच जरांगे पाटील यांचा संघर्ष सर्वांसमोर येणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘संघर्षयोद्धा’ असं या चित्रपटाचं नाव असून, सध्या याची एकच चर्चा रंगली आहे. यातील जरांगे यांचा एक डायलॉग चांगलाच चर्चेत आला आहे.

‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून मांडली जाणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.

या चित्रपटात जरांगे (Manoj Jarange Patil Movie) यांची भूमिका साकारणारा रोहन पाटील याच्यासोबतच संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट

या टीझरमधील एक डायलॉग लक्षवेधी ठरला आहे. तो म्हणजे, “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर समाजाचा.. कुंकू पुसून तयार राहा”, हा जरांगे यांचा (Manoj Jarange Patil Movie ) डायलॉग विशेष लक्षवेधी ठरला आहे. येत्या 26 एप्रिलला हा ‘संघर्षयोद्धा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन मराठ्यांच्या नेतृत्वासाठी झंझावात बनून तेवत राहणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाची गाथा..असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.

News Title-  Sangharsh Yodha Manoj Jarange Patil Movie Teaser Release 

महत्त्वाच्या बातम्या –

पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा

भर कार्यक्रमात रिंकू राजगुरूसोबत चाहत्यांनी केलं असं काही की, व्हिडीओ व्हायरल

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी खर्च झाले तब्बल एवढे कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

यशस्वी व्हायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहा!

मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिली आत्याची उपमा, म्हणाले…