प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा

Sangit Sivan passed away | क्या कूल है हम, अपना सपना मनी मनी, यमला पगला दिवाना अशा सुपरहीट चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले. बुधवारी 8 मे रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

संगीत सिवन यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनाने अभिनेता रितेश देशमुख,सनी देओल यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

संगीत सिवन यांचे निधन

संगीत सिवन यांचा भाऊ संतोष सिवन हे देखील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संगीत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. अभिनेता रितेश देशमुखने देखील सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

“एक नवोदित अभिनेता म्हणून आपल्यावर विश्वास ठेवावा आणि काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’चे दिवस मला अजूनही आठवतात. उत्तम माणूस, मृदू स्वर आणि उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे संगीत सिवान. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मला हादरवून सोडले आहे.”, अशी पोस्ट रितेश देशमुखने केली आहे.

रितेश देशमुखने पोस्ट करत शोक व्यक्त केला

तसेच, अभिनेता सनी देओलने देखील पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं. “माझ्या प्रिय मित्राच्या निधनाची बातमी ऐकून विश्वास बसत नाही की, संगीत आता आमच्यासोबत नाही. पण तू नेहमी आमच्या हृदयात आणि आठवणींमध्ये राहशील.”, असं सनी देओल म्हणाला आहे.

दरम्यान, व्यूहम या चित्रपटातून संगीत सिवन यांनी सिने कारकिर्दीची (Sangit Sivan passed away ) सुरुवात केली होती.ते दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

News Title – Sangit Sivan passed away  

महत्त्वाच्या बातम्या-

“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”

नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा