सांगली

सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

सांगली | सांगली महापालिकेत महापौरपदी भाजपच्या संगिता खोत यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.

सांगली महापालिका महापौरपदासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत खोत यांना 42 तर काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली.

दरम्यान, या महापालिकेत काँग्रेसचे  20 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य असून अपक्ष विजय घाडगे यांनी मतदानात भाग घेतला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या