Sangli Congress | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे राज्याच्या राजकारणात जे अपेक्षित नव्हतं तेच घडू लागलं आहे. सांगलीत काँग्रेस (Sangli Congress) पक्षाच्या अडचणीत आता आणखी वाढ होऊ लागली आहे. सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आल्यानं सांगलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सांगलीच्या काँग्रेस (Sangli Congress) कार्यालयावरील नाव खोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
संयुक्त पक्षाची सांगली जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आलीये. तर कोल्हापूर येथील ठाकरे गटाची जागा काँग्रेसला देण्यात आली असून त्या जागेवर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीये. जागा अदलाबदली केली असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं असलं तरीही काँग्रेस कार्यकर्ते ऐकायचं नाव घेत नाहीयेत. (Sangli Congress)
सांगलीचे काँग्रेसचे (Sangli Congress) आमदार विश्वजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सांगलीतील सर्व काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सांगलीची जागा ठाकरे गटानं मिळवणं हे विश्वजीत पाटील यांना पचणी पडलं नाही. त्यासाठी आमदार विश्वजीत पाटील हे दिल्लीला भेटीसाठी गेले. त्यांनी उमेदवारीसाठी वरिष्ठांची भेट घेतली. विशाल पाटील यांना तयारी करायला सांगा असं सांगितलं. मात्र महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेस कार्यालयावरील ‘काँग्रेस’ शब्द पुसण्यात आला
काँग्रेस कार्यकर्ते आणि सांगलीतील काँग्रेस (Sangli Congress) पदाधिकारी हे संतापले आहेत. त्यांचा रोष कायम आहे. यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दालनावरील काँग्रेस या शब्दाला रंग लावत पुसण्याचं काम केलं असून आपला संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस जिल्हा कमिटी असं त्या कार्यालयाच्या इमारतीवर लिहिण्यात आलं होतं. त्यातील ‘काँग्रेस’ हे नाव पुसण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.
विशाल पाटील अपक्ष लढण्याची भूमिका घेणार?
काँग्रेस पक्षाच्या मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत राजीनामा द्यायला सुरूवात केली. मिरज तालुक्याची काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आलीये. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या घराजवळ ही बैठक बोलवण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या दालनावरील काँग्रेस हा शब्द पुसला आहे. काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका कार्यकर्ते घेताना दिसत आहेत. यासर्व राजकीय नाट्यानंतर विशाल पाटील हे अपक्ष लढण्याची भूमिका घेणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे.
News Title – Sangli Congress Leader Erase Name Of Congress From Party Office Board
महत्त्वाच्या बातम्या
11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर
विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?
“निवडून द्या अन्यथा…”, नितेश राणेंची सरपंचांना धमकी
‘लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी….’; रूपाली ठोंबरेंनी शरद पवारांना दाखवला आरसा
पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत केलं भयंकर कृत्य, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!