महाराष्ट्र सांगली

सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा; राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर

Loading...

सांगली | सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धिरज सुर्यवंशी यांनी महापालिकेच्या महासभेत राजीनामा दिला आहे. महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या. संगिता खोत या भाजपच्या सांगली महापालिकेच्या पहिल्या महापौर होत्या.

Loading...

सांगलीच्या महापौर आणि उपमहापौर यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वत: फोन करून आजच्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंती केली होती. मात्र पक्षाने ही मागणी फेटाळून लावली.

दरम्यान, महापौरपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी महिला आरक्षण होतं. मात्र भाजपने दीड वर्षांतच महापौर बदलण्याचा निर्णय घेतला.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या