सांगली | सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्याची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये आणखी 5 मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढली आहे. एकूण मृतांची संख्या आता 17 वर पोहचली आहे.
शनिवारी दुपारी आणखी 5 मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून या मृतदेहांचा शोध घेण्यात आला आहे. सापडलेल्या या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत 12 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता तर 2 जण जखमी असल्याची माहिती दिली होती. त्यात वाढ होउन मृतांची संख्या 17 वर पोहचली आहे.
दरम्यान, ब्रह्मनाळ दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी एका चिमुरड्याचा त्याच्या आईच्या कुशीतच मरण पावलेला फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमुळे अवघ्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली गेली.
महत्वाच्या बातम्या-
-माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!
-आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!
-साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला, दिला 10 कोटींचा निधी
-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”
-काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!
Comments are closed.