शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षात शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांचा विसर!

सांगली | जिल्हा परिषदेच्या शाळेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा सर्वांनाच विसर पडला.  कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे हा संतापजनक प्रकार घडला. 

या कार्यक्रमाला कडेगावच्या सभापती मंदाताई करांडे, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, दिग्विजय कदम उपस्थित होते. मात्र मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले त्या सावित्रीबाईंचा फोटो व्यासपीठावर नव्हता.

सभापतींनी मात्र आपल्या भाषणात सावित्रीबाईंचा उल्लेख केला. त्यांच्यामुळेच महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचं सांगत ग्रामीण भागातील मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रुजवण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.