बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित आईच्या बाळावर मैत्रीच्या प्रेमाची सावली, नवजात बालकाला 11 दिवस दिली आईची माया

सांगली | कोरोनाच्या काळात आपण अनेक अशा घटना पाहिल्या की ज्यातून जागतिक महामारीत माणुसकी लोप पावत चालली आहे की काय असा सवाल पडत होता. मात्र सांगलीतील केडगावातील एका विवाहित महिलेने आपल्या शेजारच्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाचा अकराव्या दिवसापासून सांभाळ करत आहे.

ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ  असं सांभाळ करणाऱ्या महिलेचं नाव आहे. कडेगाव शहरांतील आझाद चौकात त्या राहतात. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या कुटुंबातील पाच पैकी तीन जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये एका गर्भवती मातेचाही समावेश होता. गर्भवती महिला कोरोनाबाधित असताना तिला कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न झाले.

आई कोरोनाबाधित, तर निरोगी बाळाची तब्येत काहीशी नाजूक होती. त्यामुळे नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं. मात्र जेव्हा बाळंतीणीला डिस्चार्ज देण्यात दिला तेव्हा तिला बाळापासून दूर ठेवण्यात यावं असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या ऐश्वर्या यांना बाळाला सांभाळण्याची विनंती केली. त्यांनीही होकार केला.

दरम्यान, कोरोना काळात सर्वांनी माणुसकी जपली पाहिजे. ज्या घरातील लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत केली पाहिजे. त्याप्रमाणे मी माझ्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाची अकराव्या दिवसापासून माझी स्वतःची मुलगी समजून सांभाळ करत असल्याचं ऐश्वर्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

जात पात विसरत मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

केवळ दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

मुंबई-पुण्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात धावणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या 10 मे पर्यंत रद्द

“देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More