Sangli News | कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका तरुणासोबत अमानुष वागणूक झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेमविवाह (Love marriage) केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आपल्या जावयाचे अपहरण करून त्याला दोन दिवस अर्धनग्न अवस्थेत डांबून ठेवले. पोलिसांनी वेळीच या कटाचा पर्दाफाश करून तरुणाची सुखरूप सुटका केली. हे संपूर्ण प्रकरण सांगली (Sangli) जिल्ह्यातील आहे, जिथे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने (Filmy style) तरुणाला सोडवले. (Sangli News)
कोल्हापूरमधील विशाल अडसूळ (Vishal Adsul) आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवर (Instagram) झाली होती. हळूहळू दोघांमधील प्रेम वाढले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. हे लग्न मुलीच्या घरच्यांना, विशेषतः तिच्या वडिलांना आवडले नाही. या रागातून त्यांनी आपल्या जावयाचे अपहरण करण्याचा कट रचला.
जावयाला डांबून ठेवून केली मारहाण
मुलीचे वडील श्रीकृष्ण कोकरे (Shrikrishna Kokare) यांनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीने 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9:15 वाजता विशालला करवीर तालुक्यातून (Karveer Taluka) पळवून नेले. त्याला बहाण्याने एका अर्टिगा कारमध्ये (Ertiga car) बसवले आणि थेट सांगलीला नेले. तिथे त्याला एका फ्लॅटमध्ये (Flat) डांबून ठेवण्यात आले. विशालला दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि दोन दिवस अर्धनग्न अवस्थेत ठेवण्यात आले.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली
विशाल बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) तीन पथकांना तपासासाठी पाठवण्यात आले. पोलिसांना लवकरच माहिती मिळाली की विशालला त्याच्या सासऱ्यानेच पळवून नेले आहे. त्यानंतर पोलिसांनी सांगलीच्या मिरज (Miraj) परिसरात छापा टाकून श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतले.
श्रीकृष्ण कोकरे यांची चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच सत्य सांगितले. त्यांनी सांगितले की विशालला वेदस अपार्टमेंटमध्ये (Vedas Apartment) डांबून ठेवले आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅटचा दरवाजा तोडून आत घुसले. तिथे विशाल जखमी अवस्थेत दोरीने बांधलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ त्याची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Sangli News)
Title : Sangli News Father in Law Kidnaps Son in Law Tortures Him for Two Days