पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू, गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जाळला

सांगली | पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीय. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

2 आरोपी पोलिस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांकडून रचण्यात आला होता. यापैकी अनिकेत कोथळेचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं स्पष्ट झालं. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोलीला नेऊन जाळण्यात आला. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली तसेच थर्ड डिग्री दिल्यामुळे अनिकेतचा मृत्यू झाल्याचही मान्य केलंय.