सांगली | सांगलीमध्ये धारदार शस्त्राने वार करुन पोलिसाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. समाधान मानटे असं हत्या झालेल्या पोलिसाचं नाव आहे.
कामावरुन घरी येताना मध्यरात्रीच्या सुमारास मानटे हॉटेल रत्ना डिलक्समध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. यावेळी काऊंटरवर काही ग्राहकांसोबत त्यांचा वाद झाला. त्या ग्राहकांनी गाडीतून हत्यार आणून मानटेंवर वार केले.
मानटेच्या शरीरावर तब्बल 18 वेळा वार करण्यात आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मानटेंच्या हत्येनं पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!
-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!
-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील
-एक प्रियकर अन् दोन प्रेयसी; पहिलीनं दुसरीवर घडवून आणला बलात्कार!
-रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी आहेत; धनंजय मुंडेंचा आरोप
Comments are closed.