सांगली | सांगलीमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेली बोट पाण्याच्या प्रवाहाने उलटली आहे. या दुर्घनेत 16 जण बुडाले आहेत. पाण्यात बुडालेल्यांचा शोध सुरु आहे. अद्याप मृताच्या आकडेवारीला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.
पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यावेळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बोट पलटी झाल्याची माहिती मिळत आहे. बोटीतील 16 जण पाण्यात बुडाले असल्याची माहिती मिळत आहे.
एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहचलं असून जवान बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. ही बोट ग्रामपंचायतीची असल्याचं कळतंय. बोटमध्ये बसलेल्यापैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हत.
दरम्यान, काही दिवस सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीला महापूर आला आहे. सांगली शहराच्या मध्यवर्तीपर्यंत पाणी शिरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जनाची नाही तर मनाची लाज बाळगून पदाचा राजीनामा द्या; मनसेची मागणी
-आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे- अमोल कोल्हे
-“अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढली”
-पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येतं- गुलाम नबी आझाद
-खड्ड्यांमध्ये दुचाकी घसरल्याने वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला
Comments are closed.