Top News महाराष्ट्र सांगली

‘निट काढलास ना रे फोटो’; सहा वर्षाच्या रुद्रने केलं पाटलांचं खास फोटोशुट

सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या भाषणामुळे आणि विरोधकांना कोपरखळ्या मारताना दिसतात. मात्र आज पाटील आपल्या मतदारसंघातील नवेखेड येथे आले होते. तेव्हा या जयंत पाटलांचा अंदाज काही वेगळाच होता. तिथे त्यांना एका चिमुकल्याने फोटोची काढायचा असल्याचं म्हटलं.

त्यानंतर पाटलांचं एका 6 वर्षाचा चिमुकला रुद्र सागर जंगम याने फोटोसेशन केलं. रूद्र म्हणाला, मला तुमचा फोटो काढायचाय, तेव्हा पाटलांनी या चिमुरड्याला नाराज न करता फोटो काढले.

रूद्रने जयंतरावांचे जवळपास सात ते आठ फोटो काढले. यानंतर त्याला निट काढलास ना रे फोटो, असं म्हणत त्याला शाबासकी दिली. रूद्रने पाटलांना त्याच्या शैलीत खास मंगलाष्टकाही बोलून दाखवली.

दरम्यान, रुद्रने जयंत पाटील यांचा काढलेला हा फोटो सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सांगली जिल्ह्यातील लोक या लहानग्याचं भरभरून कौतुक करत आहेत. जयंत पाटील यांनीही या चिमुकल्यासोबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

 

थोडक्यात बातमया-

…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो

कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मुंबईकरांनी खूप भोगलंय, आणखी त्रास नको; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना जोडले हात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या