राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का? संग्राम जगताप म्हणतात…

अहमदनगर | संपूर्ण राज्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत.

जावयाला उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने सासऱ्यांची म्हणजेच शिवाजीराव कर्डिलेंची गोची केलीय का? त्यावर संग्राम जगताप म्हणाले, शिवाजीराव कर्डिले दोन्ही पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छूक नव्हते. म्हणून त्यांची गोची होण्याचा इथे प्रश्नच येत नाही.

शेवटी सासऱ्यांचा म्हणजे शिवाजीराव कर्डिलेंचा पक्ष वेगळा आहे, असंही संग्राम जगताप सांगायला विसरले नाहीत.

100 टक्के नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार होईल त्यासाठी आमची ताकद आम्ही पणाला लावू, असंही संग्राम जगताप म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेते प्रतिक पाटील म्हणतात…..

आता इम्तियाज जलीलांना फक्त ओवैसींच्या आदेशाची प्रतिक्षा!

…’याच’ कारणासाठी चेन्नईचा संघ आगळा वेगळा ठरतो!

-माढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते पण त्यांनी फोनच उचलला नाही, अजित पवारांनी केला गौप्यस्फोट

धक्कादायक! काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा