राष्ट्रवादीच्या आमदाराकडूनच पक्षाला घरचा आहेर, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अहमदनगर | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हिंदू पुरोहितांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली. अमोल मिटकींच्या वक्तव्याचा विरोधी पक्षासह राज्यभरातून निषेध करण्यात येत असताना राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारानेही मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
ब्राम्हण समाजाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी मिटकरींविरोधात आक्रमक आंदोलनं केले जात आहेत. राष्ट्रवादीचे अहमदनगर शहरातील आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनीही या आंदोलनात सहभाग घेत मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
संग्राम जगताप हे ब्राम्हण समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिस ठाण्यात गेले. यावेळे त्यांनी अमोल मिटकरींसह राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात तक्रार नोंदवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचं नाव मात्र यातून वगळण्यात आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आपले मत व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे, असं संग्राम जगताप म्हणाले. तर आम्ही याविरोधात आंदोलन करत असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असंही जगताप यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“राष्ट्रवादीच्या या ‘तुकडे तुकडे गँग’ला शरद पवारांनी सांभाळावं”
“देवेंद्र फडणवीसांना तेव्हाच सुबुद्धी आली असती तर कदाचित…”
महाराष्ट्र अंधारात जाणार?, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“…तर मी माफी मागायला तयार”, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
…अन् इंग्लंडचे पंतप्रधान पडले जेसीबीच्या प्रेमात; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Comments are closed.