बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज

पुणे | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते पुण्यातील वेल्हे तालुक्यातील विविध विकासकामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं आहे. त्यावेळी बोलत असताना पुण्यातील आणखी एका मंत्रिपदाबद्दल भाष्य केलं आहे. वेल्ह्यात आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopate) यांच्या निधीतील विकासकामांचं भूमीपुजन आज करण्यात आलं.

संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काँग्रेस पक्ष राजस्थानची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणार का?, असा प्रश्नही विचारला जात आहे. या कार्यक्रमावेळी बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, ‘तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी आता जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळातील जागा भराव्यात अशी आमची इच्छा आहे.’

हायकमांड काय निर्णय घेतंय ते बघूया, असं म्हणत येत्या 4 ते 5 महिन्यात तुमच्या मनातील इच्छा पुर्ण होईल, असं बोलून नाना पटोलेंनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाबाबत (Ministry to Sangram Thopate) मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुण्याला आता आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानंतर थोपटे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पदावरून नाना पटोले यांनी संग्राम थोपटे यांना स्वानुभव सांगत ज्या खुर्चीवर मी बसलो होतो. त्या ठिकाणी तुम्ही बसलात तर तुुम्हाला बाहेर फिरता येणार नाही, शिवाय तुम्ही वाघासारखे आहात, तुम्ही मैदानात राहायला हवं, असा सल्लाही पटोलेंनी थोपटे यांना देत तुम्हाला नेमकं काय हवं ते एकदा ठरवून घ्या, असं नाना पटोलेंनी बोलताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

या वर्षी 180 टक्क्यांनी वाढला टाटांचा ‘हा’ शेअर, झुनझुनवालांचीही आहे गुंतवणूक

रहमानच्या मुलीच्या आवाजातही आहे जादू, पाहा दुबईतला खास व्हिडीओ

“विराट कोहलीला कायमचा डच्चू, रोहित नव्हे ‘या’ खेळाडूला करणार पूर्णवेळ कर्णधार”

आत्ताची सर्वात मोठी बातमी- परमबीर सिंह पुन्हा पदभार स्वीकारणार?

पोलिसांनी सुरु केलीय वसुली?, आमदारानं पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More