बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली

मुंबई | मी पाक क्रिकेट संघाची आई नाही किंवा आहारतज्ञ देखील नाही, अशा शब्दांत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सानिया मिर्झा पती शोएब आणि पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये काही जण हुक्का पीत असताना दिसत होते. यावरूनच वीणा मलिकने ट्वीट करत सानियावर निशाणा साधला आहे.

सानिया मला तुझ्या बाळाची काळजी वाटते. तुम्ही त्याला शिशा पॅलेसमध्ये गेऊन गेलात हे त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असं ट्वीट वीणाने केलं होतं.

सानियाने वीणाला उत्तर देत मी माझ्या बाळाला सोबत घेऊन गेेल नव्हते आणि माझ्या बाळाची काळजी मला आहे, असं उत्तर सानियाने ट्वीट करत दिलं आहे. सानियाने काही ट्वीट डिलीट देखली केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल

-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू

-राष्ट्रवादीचे ‘राजे’ शिवबंधनात अडकणार? चर्चांना उधाण

-एकवीस, बावीस नव्हे, वीस एक, वीस दोन म्हणा; उजळणीत बालभारतीकडून धक्कादायक बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More