Sania Mirza | शोएबसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने ठरलेलं लग्न मोडलेलं; ‘या’ व्यक्तीच्या होती प्रेमात

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचं नातं संपुष्टात आलं आहे. दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, शोएबने नुकतेच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) तिसऱ्यांदा लग्न करून नवा संसार थाटला आहे.

सना जावेदने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. हे फोटो पोस्ट होताच वाऱ्यासारखे व्हायरल झाले. त्यामुळे सध्या सगळीकडे शोएबच्या लग्नाचीच चर्चा होत आहे. या बातमीमुळे सानियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, सानियाने शोएबशी लग्न करण्यापुर्वी तिच्या लहानपणीच्या मित्राशी साखरपुडा केला होता, ही माहिती बऱ्याच जणांना माहीत नाही. आज याचीही चर्चा होत आहे.

सानियाचे पहिले लग्न का मोडले होते?

सानियाने (Sania Mirza) शोएब मलिकशी लग्न करण्यापुर्वी शोहराब मिर्जासोबत साखरपुडा केला होता. हा तिचा बालपणीचा मित्र होता. शोहराब मिर्जाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आम्ही आमच्या मर्जीने एकत्र आलो आलो होतो आणि आमच्या मर्जीनेच विभक्त झालो होतो. आम्हाला साखरपुडा झाल्यानंतर आम्ही सोबत नाही राहू शकत समजलं. त्यामुळे आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

या काळात सानिया आपल्या खेळामुळे चर्चेत होती. जेव्हा तिच्या साखरपुडा तुटल्याची माहिती आली तेव्हा एकच खळबळ उडाली होती. यानंतर शोएब आणि तिच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या. नंतर त्यांनी 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना इजहान नावाचा एक मुलगाही आहे. त्यामुळे सानियाचं नातं एकदा नाही तर, दोनदा तुटले आहे. सोशल मिडियावर याचीही एकच चर्चा रंगत आहे.

शोएब मलिकने तिसऱ्यांदा थाटला संसार-

सानिया (Sania Mirza) आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत होत्या. सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिकमधील घटस्फोटाच्या अफवा आणखीन वाढल्या होत्या. यात तिने लिहिलं होतं की, ‘लग्न कठीण आहे घटस्फोट घेणं कठीण आहे’, या पोस्टच्या तीनच दिवसांनंतर शोएबच्या लग्नाची बातमी समोर आली.

शोएब आणि सना यांच्या डेटिंगबद्दल खूप दिवसांपासून बोललं गेले. शोएबने अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. दोघांनी अखेर लग्न करत सर्वांनाच धक्का दिला. सना जावेद पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा शोएबसोबत दूसरा विवाह आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. तिने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते. आता तीने शोएबशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे.

News Title :  Sania Mirza engaged to sohrab mirza

महत्त्वाच्या बातम्या-

PMEGP Loan | स्वतःचा व्यवसाय करायचाय?, मग फक्त आधार कार्डवर मिळवा तब्बल 10 लाखांचं लोन

Sania Mirza | ‘तुला सांगत होतो लग्न करु नको’; सोशल मीडियावर सानिया मिर्झा ट्रोल

Shoaib Malik ने ‘या’ अभिनेत्रीसाठी मोडलं सानियासोबतचं लग्न!

Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

PPF Vs SIP, कुठे मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या