Sania Mirza | शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची पहिलीच पोस्ट, म्हणाली..

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे.यानंतर भारतासह पाकिस्तानमधूनही शोएबवर टीका केली जात आहे.

सोशल मिडियावर शोएबला प्रचंड टार्गेट केले जात आहे. अशातच आता घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने पहिली पोस्ट केली आहे. तीने आपला फोटो पोस्ट करत ‘एका’ शब्दाची पोस्ट केली आहे. यावर सोशल युजरकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

सानिया मिर्झाची पोस्ट

सानियाने (Sania Mirza) आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. काळ्या रंगाचा ड्रेस घालत तीने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तीने एकाच शब्दाचे कॅप्शन दिले आहे. तीने ‘रिफ्लेक्शन..’ असा शब्द लिहिला आहे. या एकाच शब्दाची पोस्टदेखील आता व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सोशल मिडियावरील युजर आता थेट शोएबला टार्गेट करत आहेत. ‘शोएब मलिक हेट बटन…’, असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसऱ्या एकाने ‘सानियासाठी रिस्पेक्ट बटन…’ अशी कमेन्ट केली आहे. तर, ‘सानिया आम्ही तुझ्यासोबत आहोत.’, अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर नेटकरी करत आहेत. त्यामुळे सानियाची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

शोएब मलिक नेटकऱ्यांकडून टार्गेट

दरम्यान, शोएब मलिकने (Shoaib Malik) सना जावेद या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं आहे. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. एका शूटदरम्यान त्यांची भेट झाली.नंतर त्यांच्या चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.

त्यामुळे सना आणि शोएब अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सानियाला (Sania Mirza) धोका देत त्याने विवाहबाह्य संबंध ठेवले. यामुळे शोएबवर प्रचंड टीका केली जात आहे. एवढेच नाही तर, शोएबमुळे पाकिस्तानी मुलांच्या मानसिकतेबाबत आता चर्चा होत आहे.

News Title :  Sania Mirza first post after divorce

महत्वाच्या बातम्या- 

Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान

Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?

Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..

Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याने केलं मोठं वक्तव्य!