Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे. घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.
सानियाने सतत काही न काही पोस्ट करत आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. ती सतत सोशल मीडियावरती सक्रिय असते. तिने आता आपल्या भूतकाळाला मागं टाकलं आहे. अशात सानियाच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलंय. तिच्या एका फोटोमुळे चर्चेला उधाण आलंय.
सानिया मिर्झाचा मोठा निर्णय
घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईतील घरात राहत आहे. या घराच्या नेमप्लेटचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलाय. पोस्टमध्ये नेमप्लेटवर दोन नावं दिसत आहेत. सानिया आणि इझहान ही दोन नावं त्यावर लिहिली आहेत. इझहान हे सानिया आणि शोएबच्या मुलाचं नाव आहे. घटस्फोटानंतर तो आईकडेच राहतोय. सानियाची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली आहे. चाहते सानियाच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सानिया आणि शोएबने 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. भारत आणि पाकिस्तानात या दोघांचं नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शोएबचं पहिलं लग्न आयेशा सिद्दिकी नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. सानियासोबत त्याचं दुसरं लग्न होतं. मात्र, दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.
View this post on Instagram
सानिया मिर्झा-शोएब मलिक घटस्फोट
शोएब आता सना जावेदसोबत आयुष्य जगतोय.सना जावेद ही पेशाने अभिनेत्री आहे. तिने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. एका शूटदरम्यान त्यांची भेट झाली होती. बरेच दिवस डेट करत त्यांनी लग्न करत संसार थाटला.
सानिया (Sania Mirza) आणि शोएब यांच्या घटस्फोटानंतर शोएबवर पाकिस्तानमधूनही बरीच टीका करण्यात आली. चाहत्यांकडून अजूनही शोएबला सोशल मिडियावर टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे पाकिस्तानी मुलांच्या मानसिकतेवरही प्रश्न केले गेले.
News Title- Sania Mirza instagram post in discussion
महत्त्वाच्या बातम्या –
महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत आहे तरी किती? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले
रश्मी ठाकरेंबाबत बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले…
“पुणे शहरात आता टू-व्हिलर चालवायला सुद्धा भीती वाटत आहे”