Sania Mirza | माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून (Shoaib Malik) घटस्फोट घेतल्यानंतर ती अधिक चर्चेत आली आहे. सानिया सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांसोबत संवाद साधते. नुकतीच तिने एक ‘लव्ह लेटर’ नावाची पोस्ट शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सानियाचे ‘लव्ह लेटर’ नेमके कोणासाठी?
सानियाने नुकतीच एक भावनिक पोस्ट लिहिली असून तिला ‘लव्ह लेटर’ असे नाव दिले आहे. मात्र, हे पत्र कोणत्याही खास व्यक्तीसाठी नसून, सर्व खेळाडूंना (Athletes) उद्देशून लिहिले आहे. तिने या पोस्टमध्ये खेळाडूंच्या संघर्षाची, त्यागाची आणि भावनिक प्रवासाबाबत लिहिले आहे.
सानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “स्वप्नांचा विचार करा, तुमच्या पॅशनचा पाठलाग करा… हे तुम्हाला पैसे, प्रवास आणि प्रसिद्धी मिळवून देईल. पण खेळ एकट्याने खेळणे किती अवघड असते. यामध्ये कधी कधी प्रचंड एकटेपणा जाणवतो. जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा त्यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते.”
ती पुढे म्हणते, “खेळाडूंना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. एका टप्प्यानंतर त्यांना हे समजते की त्यांना फक्त पैसा आणि पुरस्कार नव्हे, तर लोकांचे प्रेम हवे असते. हा प्रवास कठीण असला तरी त्यामुळेच एका खेळाडूचे जीवन आकार घेते.”
सायना नेहवालच्या नवऱ्याचीही प्रतिक्रिया
सानियाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे, भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा (Saina Nehwal) पती आणि कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेता परुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने या पोस्टवर फायर ईमोजी शेअर करून प्रतिसाद दिला आहे.
सानियाच्या या भावनिक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, तिच्या शब्दांनी अनेक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी प्रभावित झाले आहेत.
Title : Sania Mirza Love Letter Goes Viral