बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

नवी दिल्ली | अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेली विश्वचषक स्पर्धाला आज सुरूवात झाली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कोणीही महासत्ता असेल पण खरी मज्जा तर भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात असते. भारत आणि पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी मैदानावर भिडणार म्हणलं की सोशल मीडियावर दोन्हीकडील फॅन्समध्ये युद्ध रंगतं. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं एक विशेष घोषणा केली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यादरम्यान कित्येकदा सानिया मिर्झाला पाकिस्तानची सुन असल्यानं ट्रोल करण्यात येतं. परिणामी तिने 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची घोषणा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर करत सानिया मिर्झानं ही घोषणा केली आहे.

मी भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान वातावरण खराब होण्यापासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचं सानिया हा व्हिडीओ शेअर करत म्हणाली आहे. सानियाचा पती शोएब मलिक हा पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळतो. तो भारत आणि पाकिस्तान सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तान कधीच टी ट्वेंटी विश्वचषकात भारताला पराभूत करू शकला नाही. 2007 साली 2 वेळा, 2012, 2014, 2016 साली प्रत्येकी एक वेळा असं एकूण 5 वेळा भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

पाहा व्हिडीओ –

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

थोडक्यात बातम्या 

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

रेल्वेच्या ‘या’ विभागाने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी…’; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More