बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील हिंजवडीमधील उरवडे जवळील एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत 14 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.

केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं बेपत्ता आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे. आत मध्ये अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेल्याची माहिती आहे. या ठिकाणी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोचलेले आहेत.

दरम्यान, जेसीबीच्या मदतीने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याची माहिती समजत आहे. आग कशामुळे लागली अद्याप याबाबत ठोस असं कारण समजू शकलेलं नाही.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान गरीब योजनेतून इतक्या महिन्यापर्यंत जनतेला मिळणार मोफत राशन

महिला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ

महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद; वाचा काय म्हणाले मोदी…

भूतकाळात भारताचं लसीकरण संथगतीने चालायचं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More