महाराष्ट्र यवतमाळ

धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात

मुंबई | यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजलं.

12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

थोडक्यात बातम्या-

अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

लेडी सब इन्स्पेक्टरकडून मानवतेचं दर्शन; एकत्र मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला; पाहा व्हिडीओ

“किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?, आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे”

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या